दिल्ली विधानसभेच्या मतदानास प्रारंभ

EVM

नवी दिल्ली । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू झाले असून या माध्यमातून रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते आपले नशीब आजमावत आहेत.

Protected Content