दिल्लीत भरदिवसा अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे धमार्थ तरूण साहित सरफराज याने अत्यंत निर्दयीपणे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भरदिवसा चाकूने सपासप वार करून व क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या नराधमावर जलद न्यायालयात खटला चालवून कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन शहरातील हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लव्ह जिहादच्या नावाखाली मुलींनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या केल्याच्या घटना वारंवार घडत आहे. दिल्ली येथे २८ मे रोजी धमार्थ तरूण साहिल सरफराज या तरूणाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भर दिवसा सर्वांसमोर चाकूने २० वार करून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली आहे. असंशयित आरोपीवर न्यायालयात जलद गतीने खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, आणि देशात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी जळगाव शहरातील हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मंगळवारी ३० मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, जितू नारखेडे, रूपेश माळी, गणेश चौधरी, अनिल चौधरी, अक्षय मराठे, राज सपकाळे, अशिष ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content