नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. देशात संसर्गाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी दिल्लीत दिवसभरातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले. लस येण्यास काही काळ जाणार असल्याने सध्या तोंडाला मास्क लावणे हीच लस माना, असा सल्ला दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, “मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येण्यामागे मोठ्या प्रमाणावरील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्या कारणीभूत आहेत. रुग्णालयांतील ३५ टक्के बेड कोरोनाच्या रुग्णांनी भरले आहेत. नागरिकांनी सातत्याने तोंडाला मास्क लावावेत.”गुरुवारी दिल्लीत ५,७३९ रुग्ण आढळून आले. या दिवशी ६०,१२४ रुग्णांच्या चाचण्या पार पडल्या.
दिल्लीत प्रदुषणाची पातळी देखील खूपच वाढल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाने सांगितलं होतं. प्रदुषणवाढीमुळे देखील कोरोनाच्या संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
जैन यांनी कालचं म्हटलं होतं की, दिल्लीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.