जळगाव, प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी या इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतमजूर युनियनतर्फे मोदी सरकार विरोधात निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मागील २ महिन्यांपासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीत झालेल्या हिंसाचाराचा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संचलित जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निषेध करून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यात आला. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रकाश चौधरी यांनी दिपसिंधू सारखे भाजपचे एजेंट लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवीत होते, त्यांना मोकाट सोडण्यात आले आहे. त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. कॉ. चौधरी यांनी पुढे सांगितले की, केंद्र शासनाने पारित केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे ताबडतोब रद्द करा. कामगारांबद्दलचे जे चार लेबर संहिता केल्या आहेत त्या रद्द करून कामगारांचे सर्व हक्क बहाल करा. दरम्यान या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/221755299587020