Home धर्म-समाज दिल्लीतील चित्रपटगृहं, शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद

दिल्लीतील चित्रपटगृहं, शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद

0
28


दिल्ली, वृत्तसेवा । करोना रुग्णांची भारतासह दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेत दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “करोनाचा वाढता धोका पाहता दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच ज्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत ती सोडून इतर सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहतील.” दरम्यान, असाच निर्णय दोन दिवसांपूर्वी केरळ सरकारनेही घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, केरळमध्ये करोना विषाणाच्या संसर्गाचे आणखी ६ संशयित आढळले आहेत.


Protected Content

Play sound