नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीत संवेदनशील भागात सुरक्षा वाढवून इंटरनेट बंद करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या हिंसक प्रदर्शन आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावल्याच्या घटनेनंतर गृह मंत्रालयाने या घटनेला अत्यंत गंभारपणे घेतलं. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवासस्थानी आपत्कालीक बैठक बोलावून राजधानीमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करण्याच्या सूचना केल्या. सर्व वारसा आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात येईल. त्याशिवाय, हिसेंसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची ओळख करुन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत
दिल्लीत मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीने घेतलेलं हिंसक रूप आणि अनेक ठिकाणांवर पोलिसांसोबत हिंसेच्या घटनेला गंभारतेने घेत गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत राजधानीमध्ये सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करण्यात आली आहे. गुप्त संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या.
शेतकरी आंदोलनाअंतर्गत प्रतिबंधित संस्थेकडून हिंसेला प्रोत्साहन देण्याचे इनपुट गुप्त संस्थांना मिळालं होतं. गुप्त संस्थेने पुढेही हिंसेची शक्यता नाकारता येत नाही.असे सांगितले या बैठकीत गृह सचिव आणि आईबीचे डायरेक्टर उपस्थित होते.
सर्व संवेदनशील स्थानांवर अतिरिक्त पॅरामिल्रिटी फोर्सेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन, पुढे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटना होऊ नये. हिंसक प्रदर्शनात सहभागी लोकांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने या बैठकीत दिल्ली पोलिसांना राजधानीमध्ये हिंसक प्रदर्शनामागे ज्यांचा हात होता त्यांची ओळख पटवण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे सध्या त्या सर्व ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची चाचणी केली जात आहे,
आंदोलन झालेल्या स्थानावर आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहे. सिंघु, टीकरी, गाझीपूर बॉर्डर, नांगलोई इत्यादी क्षेत्रांतील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्या आहेत