नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दिवस उरलेले असतांना सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडीला (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) ओएसडी दोन लाखांची लाच घेतांना अटक केली आहे. गोपाल कृष्ण माधव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
सिसोदिया यांच्या कार्यालयात 2015 मध्ये ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आलेले गोपाल कृष्ण माधववर जीएसटी गोळा करण्याची जबाबदारी आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीएसटीचे एक प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान, आम्ही सीबीआयच्या कारवाई आणि टायमिंगवर कुठलाही प्रश्न उपस्थित करत नाही. जो कुणी लाच घेत असेल त्याला तत्काळ अटक करायला हवी, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.