दिलासादायक ; जिल्ह्यात आजच्या कोरोना बाधितांपेक्षा दुप्पट बरे झाले !

 

जळगाव : प्रतिनिधी ।  जिल्ह्यात आज कोरोना बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या दुपटीने  जास्त असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे  ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही  कमी   दिसून आली आहे

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात नव्याने  ४०६  बाधित रूग्ण आढळले आहे. तर ८७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातून ०९ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

 

 

जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण- ०८, भुसावळ- ३१, अमळनेर-२३, चोपडा- ३६, पाचोरा- २८, भडगाव-०२, धरणगाव-१४, यावल-२२, एरंडोल- २५, जामनेर- ४८, रावेर- ३१, पारोळा  -१७ , चाळीसगाव- ५५ , मुक्ताईनगर- १६ , बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील १०  असे एकुण ४ ०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ३७ हजार ९५१ बाधित रूग्ण आढळलेत त्यापैकी १ लाख २७ हजार १६७  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८ हजार ३०६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली  आहे.

 

Protected Content