जळगाव प्रतिनिधी । औद्योगीक वसाहत परिसरातील रिद्धी-सिद्धी दालमिलमधील कामगारानेच दालमिलमधून पावणेतीन लाख रुपयाचे हरभरा डाळीचे ९७ गोण्या लांबविल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलीसांना संशयित कामगाराला अटक केली असून न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अधिक माहिती अशी की, अयोध्यानगरातील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय-४७) यांची औद्योगीक वसाहत व्ही सेक्टर मध्ये रिद्धी सिद्धी दालमिल आहे. प्रकाश जोशी ३१ ऑक्टोबरला बाहेरगावी गेले होते. शनिवार ७ नोहेंबर रोजी परत आल्यावर त्यांनी कंपनीत येणार्या व जाणार्या मालाची माहिती घेतली असता, हरभरा डाळीचे 98 पोती चोरी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चोरट्यांनी २ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे ९८ पोते डाळ चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना तपासात कंपनीत काम करणार्या मिश्रीलाल शिवलाल जावरकर (वय 42 मूळ रा. रायपूर त खालवा, जि. खंडवा, ह.मु. रिध्दी सिध्दी इंटरप्राईजेस, V सेंक्टर १०५ एमआयडीसी जळगाव ) यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील , रतिलाल पवार, चेतन सोनवणे,चंद्रकांत पाटील , मुकेश पाटील , सचिन पाटील योगेश बारी यांच्या पथकाने मिश्रीलाल जावरकर याच्या मुसक्या आवळल्या. त्यास सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी संशयित मिश्रीलाल यास 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.