इचलकरंजी वृत्तसंस्था । दररोज दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाला त्याच्या आईने संतपाच्या भरात दगडी वरवंटा टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. इचलकरंजी जवळील कोरोची या गावात ही घटना घडला आहे. रविशंकर तेलसिंगे (वय-३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मृत मुलाची आई लक्ष्मी तेलसिंगे यांना ताब्यात घेतले आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
इचलकरंजी जवळ असलेले कोरोची येथील तीन विहिरीजवळ ही घटना काल रात्री उशिरा घडली. आईने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याच्या घटनने संपूर्ण परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. किरकोळ काम करणारा रविशंकर हा नेहमी दारू पिऊन घरच्यांना त्रास देत होता. शिवीगाळ मारहाण करणे असे प्रकार असह्य झाल्याने त्याच्या आईने अखेर संतापाच्याभरात हे टोकाचे पाऊल उचलले, असल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास आई व मुलात जोरदार भांडणं झाली होती. दरम्यान, आईने रागाच्या भरात वरवंटा मुलाच्या दिशेने फेकला. त्याच्या डोक्याला वर्मी घाव बसला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रविशंकरला तातडीने इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले होते.