नाशिक (वृत्तसंस्था) दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार निफाड तालुक्यातल्या सोनेवाडी बुद्रुक येथे घडला आहे.
नवरा बायकोच्या भांडणात वडील पडल्याने रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. बबन निवृत्ती निरभवणे असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली आहे.