जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील महावितरणच्या स्टेशन येथे महावितरणच्या सब स्टेशन येथे एकाने दारूसाठी पैसे न दिल्याने दारूच्याच नशेत कॉन्ट्रॅक्टरला लोखंडी आसारी मारून दुखापत केल्याची घटना रविवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे
अयोध्यानगर येथे संजय रामभाऊ वराडे कॉन्ट्रॅक्टर वास्तव्यास आहेत. ते रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील महावितरणच्या स्टेशनच्या आवारात असताना, या ठिकाणी जालम शोभाराम पवार हा आला. तो दारूच्या नशेत होता. या दरम्यान त्याने संजय वराडे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले . वराडे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता जालम पवार याने लोखंडी आसारी वराडे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली तसेच शिवीगाळ करत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास याप्रकरणी संजय वराडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून जालम शोभाराम पवार रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित जालम पवार यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.