जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरूणावर ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घ्ज्ञडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अरबाज रउफ खाटीक (वय-२४) रा. जुम्मा शहा वखारजळगाव तांबापूरा, जळगाव हा तरूण भंगार खरेदी विक्रीचे काम करतो. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास समीर काकर रा. तांबापूरा जळगाव याने अरबाज कडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अरबाज खाटीक याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून समीरने हातातील ब्लेडने वार करून कानाला गंभीर दुखापत केली. त्यांला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात समीर काकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एकावर ब्लेडने वार
2 years ago
No Comments