जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा शिवारातील दांडेकर नगरातून मजूराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश ओंकार पाटील (वय-४९) हे आपल्या परिवाराससह दांडेकर नगर पिंप्राळा येथे वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांनी दुचाकी (एमएच १९ सीटी २४३७) पार्किंगला लावलेली होती. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.