मुंबई, वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जाणार नाही. याच धर्तीवर दहीहंडीवर देखील कोरोनाचे सावट आले आहे. भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे.
राम कदम यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. घाटकोपर परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात राम कदम दहीहंडी उत्सवाच आयोजन करतात. यावेळी हजारोंच्या संख्येत गोविंदा आणि सामान्य लोकं उपस्थित असतात. यामुळे जनहिताचा विचार करून दहीहंडीचं आयोजन न करण्याचा राम कदम यांनी निर्णय घेतला आहे. मुंबईत दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथक खूप मेहनत घेतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.