अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कानुबाई उत्सव मोठ्या उत्साहात खान्देशात साजरा होत असून दहिवद येथे देसले परिवाराने गावातील गोरगरिबांना जेवणाचे डब्बे वाटप करत साजरा केला. या निमित्ताने उत्सवातून समाजसेवेचे दर्शन घडवले.
गावांतील देसले परिवारातील प्राध्यापक लेफ्टनंट जितेंद्र देसले यांनी कानबाई उत्सव व त्यांच्या आई स्वर्गीय लताबाई जिजाऊराव देसले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने गावातील गरिबांना जेवणाचे चार ताली डबे वाटप केले.
या कार्यक्रमात मायबोली अहिराणीचा जागर करून तुफान विनोदी एकपात्री नाटक आयतपोयत सख्यानं प्रवीण माळी यांनी सादर केल.
त्यांनी आहिराणीचा जागर करत समाज प्रबोधन करून संपूर्ण गावाला पोटधरून हसवले. यावेळी गावांतील असंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
त्याच बरोबर खानदेशातील लोकप्रिय गायक अशोक वनारसे यांचा कानबाई मातेच्या गीतांचा कार्यक्रम केला. गावाला यावेळेस यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते कानबाई मातेच्या गाण्यांनी संपूर्ण गाव भक्तिसागरात मंत्रमुग्ध होत रममान झाले.
गावात कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली .यातच बऱ्याच दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने गावकऱ्यांचा आंनद द्विगणिक झाला.
उत्साहातुन समाजसेवेचे दर्शन घडवत दहिवद येथील देसले परिवाराने खान्देश मधील जनतेसाठी एक नवा आदर्श घडवून दिला. या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू असून अश्या कार्यक्रमांची गरज असल्याची चर्चा समाज माध्यमातून होत आहे.यानिमित्ताने देसले परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.