यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त आज १६ रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.
सावखेडा तिम रस्त्यावरील इदगाह पासून तर खंडेरावाच्या मंदिरापर्यंत बारागाड्या अंतर कंबळगाव येथील मधुकर भगत यांचे मार्गदर्शनाखाली येथील पंडित राजपूत यांनी बारागाड्या ओढल्या. यासाठी सकाळी गावातून सर्व देवदेवतांचे मूर्तीच्या पूजाअर्चना करण्यात आल्यात सांयकाळी ५ वाजता बारागाड्या ओढण्यासाठी भगत व कार्यकर्ते बारा गाडया ठिकाणावर पोहोचवल्यात उपसरपंच देवीदास पाटील ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र पाटील, भिकन विश्राम पाटील, भरत बुवा, बाळकृष्ण पाटील चौधरी, प्रमोद चौधरी, सुरेश पाटील, पं.स. आणि जि.प.चे माजी सदस्य सुरेश पाटील, पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन रमेश साहेबराव पाटील, सचिव एस.के. पाटील तसेच सर्व पीक संरक्षण संस्थेचे रखवालदार यांनी परिश्रम घेतले. मुस्लीम समाजातील गफार पठाण यांनी बारागाड्या बांधण्याचे काम केले. शांततेत पार पाडण्यासाठी कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, मराठी राहुल पांचाळ, सतीश भोई, इस्माईल तडवी, होमगार्ड जनार्दन महाजन, पोलीस पाटील, संतोष देवराम पाटील यांनी परिश्रम घेतले. गावकऱ्यांच्या सहकार्याने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. संपुर्ण यात्रा शांतेत पार पाडण्यासाठी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.