यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील गावठाण भागात अचानक खळ्याला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या आगत ५० हजार रूपयाचे गुरांचा चारा व शेती साहित्याचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की , यावल तालुक्यातील दहिगाव येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दहिगाव येथील शेतकरी अरुण जंगलू अत्तरदे यांचे चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण प्लॉट भागालगतच्या खळ्याला आग लागली होती. आग लागता क्षणी लगतच असलेल्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पंपाच्या साह्याने आग विझवण्यात आली. यावल येथील नगरपालिकेचा अग्निशामक बंब बोलवून ती विझवण्यात आली .गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बाजूला बांधलेले गाई व म्हशी यांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.