जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पार्वतीनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवार, ११ मे रोजी रामानंदनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील माहेर असलेल्या क्रांती स्वप्निल काटकर वय २८ यांचा नागपूर जिल्ह्यातील पडोळे येथील स्वप्निल सिध्दार्थ काटकर यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी क्रांती यांनी माहेरुन १० लाख रुपये आणावेत या कारणावरुन त्यांचा छळ केला, तसेच या कारणावरुन वेळावेळी क्रांती यांना शिवीगाळ करत मारहाण करत त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून क्रांती ह्या माहेरी निघून आल्या. व त्यांनी याबाबत गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन क्रांती यांचे पती स्वप्निल सिध्दार्थ काटकर, साधना सिध्दार्थ काटकर, सिध्दार्थ श्रीराम काटकर, राम सिध्दार्थ काटकर, या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील हे करीत आहेत.