Home Uncategorized दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !


मुंबई (वृत्तसंस्था) मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या बुधवारी (२९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी १ वाजता मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

 

 

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या बुधवार २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. दरम्यान, मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल www.maharesult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे, तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाणार आहे.


Protected Content

Play sound