अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यासह जिल्ह्यात येत्या दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन थांबवावे, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेतर्फे आज करण्यात आली.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रावण हा आदिवासी महात्मा होता. रावणाचा अत्यंत द्वेष व विकृत मानसिकता ठेवून पुतळा दहन केला जातो. आणि यामुळे देशातील आदिवासींना हीन भावनेने वागणूक मिळत असते. तसेच रावण दहन करणे हा आदिवासी समाजाचा अपमान आहे. म्हणून अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातील रावण दहन कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी यावेळी आदिवासी एकता परिषदेने केली आहे.
या बाबत अमळनेर प्रांताअधिकारी सीमा अहिरे, DYSP राकेश जाधव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद पवार , महेंद्र पवार आदी उपस्थित होते.