जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्नात असलेला रामानंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीकडून गावठी पिस्तूल व दरोद्याचंदडाचे साहित्य हस्तगत केले आहे या संदर्भात रविवारी ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात असलेल्या १०० फूट रोडला लागून असलेल्या प्रतीक पार्क आपारमेंट या ठिकाणी रविवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दरोड्याचा प्रयत्न असलेली टोळी आली असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलीसांनी संशयित आरोपी खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयूर उर्फ विकी दीपक अलोने, दुर्गेश उर्फ पपई आत्माराम संन्याशी आणि वसीम हुसेन पटेल सर्व रा. जळगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, लोखंडी पाईप, चाकू, सुरा, लोखंडी हातोडी, हेक्सा ब्लेड व इतर सामान हस्तगत केला आहे. या टोळीकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांनी दिलेले फिर्यादीवरून ५ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पो.ना. रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दिपक वंजारी यांनी कारवाई केली.