यावल, प्रतिनिधी । यावल शहरात काल सराफा दुकानात पडलेल्या दरोडयासंदर्भात आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुकानास भेट देवून सराफा व्यापारी यांच्या कुटुंबांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
यावल शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मालकीच्या सराफा दुकानावर पडलेल्या दरोडयाविषयी पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय टाकला असुन, मुख्यमंत्री यांनी या विषयास गांर्भीयाने घेतले त्यांनी तात्काळ आरोपींच्या शोध घ्यावा असे आदेश दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले
आमदारांनी सराफा व्यावसायीक कवडीवाले यांच्या कुटुंबास धिर दिला दागीने गेले पण सुदैवाने सोन्यासारखी आपली माणसे वाचली याचा आपण विचार करावा ज्या युवकांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा धाडस दाखवले त्यांचे विशेष कौतूक मुक्ताईनगरचे आमदार चंदकांत पाटील यांनी यावेळी केले