पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील दबापिंप्री येथिल जि.प. प्राथमिक शाळेत रंगतरंग विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे डांन्स, लावण्या, मनोरंजक, जागृती अभियान त्यात, अशा अनेक कार्यक्रमातू विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि त्या विद्यार्थी विद्यार्थीनी मधील कलाविष्कार समस्त मंडळीला पहावयास मिळत होता. जनजागृतीसह देशभक्तीपर गीते तसेच इतर कार्यक्रमे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत झाले यानंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमांचे पूजन करून दिप प्रज्वलीत करण्यात आला यावेळी रत्नापिंप्री गृप ग्राम पंचायतीचे सरपंच प्रमिलाबाई भिल, उपसरपंच सुरेश पाटील , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण भागवत, उपाध्यक्ष राहुल पाटील, जि.प.सदस्य हिंमत पाटील, पारोळा गट शिक्षणाधिकारी सी.एम.चौधरी, पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सपोनि सुदर्शन दातीर, एपीआय निलेश गायकवाड, अनिल पाटील, निलेश पाटील, केंद्र प्रमुख सी.ओ.वानखेडे, ग्रा.पं. सदस्य सुरेश पाटील, विजय पाटील, रत्नाबाई पाटील, राजश्री पाटील, प्रतिभा मनोरे, सागर पाटील, विजय पाटील, किरण पारधी, भिकनराव पाटील, अंकुश भागवत, ग्रामसेवक दीपक भोसले, ज्ञानेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक भिमराव वरूडे , मनिषा पाटील, क्रांती पाटील, लिना पवार विकासोचे चेअरमन इंदिरा पाटील, राजेंद्र पाटील,सुकलाल मनोरे, रविंद्र पाटील, विजय भागवत, सुरेखा बडगुजर, बिडू जाधव , वंदना पाटील, लीना पवार, सुरेश पाटील, राजेंद्र मोरे, सुनिल मोरे, पी.व्ही.पाटील, पत्रकार रामचंद्र पाटील, निलेश पाटील, शरद पाटील, किशोर वाघ, मयुर पाटील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील व सुनिल मोरे यांनी केले तर आभार भिमराव वरूडे व मयुर पाटील यांनी मानले.