दगडाचे उत्तर दगडाने, तलवारीचे उत्तर तलवारीने : मनसे

deshpande and pathan

 

मुंबई (वृत्तसंस्था) दगडाचे उत्तर दगडाने, तलवारीचे उत्तर तलवारीने, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे, तसेच उत्तर दिले जाईल, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी पडू, असे विधान वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथं चिथावणीखोर वक्तव्य केले होते. वारीस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरही ट्विट करुन वारीस पठाण यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकेच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! , असे मनसेने ट्विट केले आहे.

Protected Content