यावल, प्रतिनिधी । येथील पंचायत समीतीअंतर्गत साकळी केंद्राची शिक्षण परीषद थोरगव्हाण येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत घेण्यात आली. शिक्षण परीषदची सुरुवात शिक्षक एकनाथ सावकारे यांच्या वतीने आदर्श पाठ, कविता, कदमताल शारीरीक हालचालीनी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना आनापान संदर्भात योग्य मार्गदर्शन पिळोदा खुर्द शाळेतील उपशिक्षक निखील संभे यांनी केले तर थोरगव्हाणच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक निलेश पाटील यांनी गणित पेटी साहित्याचा वापराबाबत माहिती देवुन मार्गदर्शन केले.शिरसाड शाळेतील उपशिक्षक किशोर पाटील यांनी प्रशासकीय सुचना संदर्भात मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी केद्रप्रमुख विजय ठाकुर होते.
यावेळी सरपंच उमेश सोनवणे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे, विनोद पाटील, सुरेश चौधरी, माजी उपसंरपच समाधान सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन मुख्यध्यापक महेद्र देवरे यांनी केले तर आभार निलेश पाटील यांनी मानले.