जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील दहा ते अकरा वर्षांपासून अनुकंपाधारकांची नियुक्ती रखडली असून या अनुकंपाधारकांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे अन्यथा मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला. दरम्यान, त्यांनी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेवून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१३ पासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या चकरा मारत आहेत. मात्र, मनपाकडून अजूनही अनुकंपाधारकांना नोकरी दिली नाही. यामुळे संतप्त होऊन अनुकंपाधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सर्वप्रकारची शासन निर्णय व नियमांची पूर्तता असतांनादेखील आयुक्तांना रिक्त पदांची उपलब्धता पाहून नियुक्तीचे अधिकार असतांना अनुकंपाधारकांना न्याय मिळत नाही. तसेच अनेक उमेदवार पात्र असूनदेखील येत्या काही दिवसात वयोमर्यादा जास्त झाल्याने नोकरी गमावून बसणार असल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. अनेक वर्षांपासून वारंवार अनुकंपाधारकांना आश्वासन देऊनदेखील त्यांना नियुक्ती मिळत नसल्याने मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अनुकंपधारकांनी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेवून समस्या मांडल्या. अनुकंपधारकांना तातडीने महापालिकेत सेवेत रूजू करण्यात यावे, अशी मागणी अनुकंपधारकांनी केली.
यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, अनुकंपाधारकांनी त्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा केला असून त्यांच्या मागण्या योग्य अशाच आहेत. तथापि, प्रशासन ढिम्म असल्याने त्यांच्या कामात अडसर निर्माण झाला आहे. आम्ही त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपुर्वक विचार करत असून त्यांना नक्कीच न्याय मिळेल ! असे सांगितले. दरम्यान, न्याय न मिळाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनुकंपधारकांनी दिला आहे.
भाग १
भाग २
भाग ३