अहमदनगर प्रतिनिधी । महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अहमदनगर महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. या निवडीसाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संबंधीतांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. या अनुषंगाने जयंत पाटील यांनी हकालपट्टीचा कारवाई केली.
जयंत पाटील यांनीसागर बोरूडे, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, विनित पाउलबुद्धे, सुनील त्रंबके, समद खान, ज्योती गाडे, शोभा बोरकर, कुमार वाकळे, रूपाली जोसेफ पारघे, अविनाश घुले, परवीन कुरेशी, शेख नजिर अहमद, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप व गणेश भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे. याशिवाय शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.