सोलापूर प्रतिनिधी । हिंगणघाट येथे शिक्षिकेला पेटवून देणार्या नराधमाला हैदराबाद येथील आरोपींप्रमाणे शिक्षा देण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. त्या या घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चानंतर बोलत होत्या.
हिंगणघाटमधील घटनेच्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी एकतर्फी प्रेमातून होणार्या गुन्ह्यांबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ”या घटनेचा मी निषेध करते. पीडित तरुणीची प्रकृती लवकर सुधारेल, अशी प्रार्थना मी करते. कायदे वगैरे असून सुद्धा या नराधम लोकांची मानसिकता कधी बदलेल, माहीत नाही. मुलींची छेडछाड करणार्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. प्रशासन व घरच्यानी पीडितेला पाठिंबा दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे. तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. हिंगणघाटातील आरोपी जागेवरच पकडला गेला आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तपास, एफआयआर व अन्य बाबींची वाट पाहण्याची गरज नाही. गुन्हेगाराला तात्काळ कठोर शिक्षा देण्यासाठी पावलं उचलायला हवीत. या खटल्यांचा निकाल नव्वद दिवसांच्या आत लागला पाहिजे किंवा हैदराबादसारखं काहीतरी करा” अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
https://www.facebook.com/ShindePraniti/videos/195868501532133