जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चिकलठाणा येथील महिलेवर अत्याचार करून हत्या करणार्या नराधमांना फाशी देण्याची मागणी येथे समाजबांधवांनी निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.
चिकलठाणा येथील महिलेवर तीन नराधमानी अमानुष अत्याचार करून त्याचा त्याची हत्या केल्याची घटना दोन एप्रिल रोजी घडली आहे. या घटनेतील नराधमांना जलद खटला चालून तात्काळ फाशी देण्यात यावी निर्भया फंडातून पीडित महिलेच्या परिवाराला २५ लाख रुपयांची मदत मिळावी, पीडित महिलेच्या मुला-मुलीची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, परिवारातील एका सदस्याला शासन शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, सदर खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी अशा मागणीचे लेखी निवेदन समाजबांधवांच्या वतीने देण्यात आले.
तहसीलदार अरुण शेवाळे यांना सदर निवेदन देण्यात आले. याप्रसंगी चंद्रसिंग लोडते, दीपक तायडे, बाबुराव हिवराळे, भारत रिस्वाल, राजू लोडते, सिताराम अंगारे, संजय लोडते, लालचंद मिमरोर, दीपक रीचवाल, गणेश आगळे, शंकर मोची, मनोज शेवाळे, हर्षल पवार यांच्यासह महिला केसाबाई भीमरोठ, पुनाबाई भिमराव भिमरोठ ,मनीषा रीछवाल, रेखाबाई रिछवाल, संगीताबाई रिछवाल लक्ष्मीबाई रेसवाल, मंगलाबाई गागे, अंकिता रेशवाला गौरी लोडते ज्योती लोडते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष समाज बांधव यावेळी उपस्थित होते.