‘त्या’ तरुणाला जळगावला तर इतर चौघांना धरणगावातील आयसोलेशन कक्षात ठेवणार

धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. प्राथमिक तपासणीनंतर यातील एका तरुणाला जळगाव जिल्हा रुग्णालयात तर इतर चौघांना धरणगावातील आयसोलेशन कक्षात ठेवणार असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.

 

अमळनेर येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राथमिक तपासणीनंतर यातील तरुणाला जळगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तर इतर चौघांना धरणगाव महाविद्यालयातील होस्टेलमध्ये तयर करण्यात आलेलेल्या आयसोलेशन कक्षात ठेवणार असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आज घटनास्थळी तातडीने धाव घेत संबंधित परिसरात निर्जंतुकीकरण करून घेतला होता.

 

अमळनेरच्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात धरणगावातील पाच जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने त्या चौघांना जळगाव जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते. संबंधित परीसरात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना स्वत: उपस्थित राहून निर्जंतूकीकरण आणि सॅनिटाझरने फवारणी करून घेतली. दरम्यान, या घटनेमुळे शहराचिंतेचे वातावरण पसरलेले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पालिका प्रशासन योग्य खबरदारी घेत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

 

शहराबाहेर असलेल्या महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू २५ एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते.  यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची लक्षण असलेल्या तसेच संशयीत रुग्णांसाठी शहरालगत असलेल्या कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हा आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला होता. याठिकाणी साधारण २० बेड आहेत. येथे सर्व सुविधायुक्त आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली होती. हा विभाग पुर्णतः स्वतंत्र राहणार आहे. या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा आहेत.

Protected Content