भुसावळ प्रतिनिधी । पालिकेने डेली मार्केटमध्ये होणार्या लिलाव स्थळी कारवाई करून पाच लाखाचा भाजीपाला जप्त केला होता. तसेच यातील आडत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, लिलाव भरवू नये, याची सूचना आम्ही अगोदरच आडत्यांना दिली होती. त्यामुळे याठिकाणी माल आलाच कसा याच्या चौकशीची मागणी भुसावळ फळ भाजीपाला अडत असोसिएशनने केली आहे.
या कारवाईसंदर्भात भाजीपाला असोसिएशनने पत्रक जाहीर केले असून, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार संघटनेने लिलाव बंद ठेवला होता. शासनाचा आदेश पाळण्यासाठी संघटना बांधील आहे. लिलाव रद्द करण्याबाबत संघटनेतर्फे आडत्यांना १० एप्रिलला सूचना दिल्या होत्या. तरी प्रशासनाने यासंदर्भात चौकशी करून आदेश धुडकावणार्यांवर कारवाईची मागणी असोसिएशनने केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००