‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत द्या ; आयटकची मागणी

चोपडा, प्रतिनिधी । येथे कार्यरत कंत्राटी तांत्रिक कर्मचारी विश्वजित चौधरी (लहान शहादा) यांचे उपचाराअभावी मृत्यू ओढवला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी आयटकतर्फे करण्यात आली आहे.

विश्वजित चौधरी यांना काल ताप आल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात नेले असता कोणीही दाखल करून घेतले नव्हते. त्यांना जेव्हा शासकीय दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पत्नी असा परिवार आहे. राज्यात कंत्राटी कर्मचारी अधिकारी, ग्राम रोजगारसेवक कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा मागणी आयटकने केली होती. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यातच विश्वजित चौधरी यांचा मृत्यू ओढवला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने ५० लाखांचा विमा सहायता निधी सोबत कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. आयटकचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, कॉम्रेड राजन क्षीरसागर, सरचिटणीस जिल्हा पदाधिकारी ललित पाटील, वृद्धेस्वर संगोरे, युवराज जमादार, श्री. राठोड व महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगारसेवक संघटना व मनरेगा कंत्राटी कर्मचारी संघटना आयटकच्या पदाधिकारी यांनी केली आहे.

Protected Content