मुंबई : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांसाठी सरकारने २५० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
याबद्दलचा शासन निर्णयही उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळावेळी काढण्यात आलेला शासन निर्णय याही वादळाच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले होते, “या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरुन राज्य सरकारला काही द्यायचंच नाही असं दिसून येत आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ह्या अहवालातली नुकसानाची आकडेवारी जाहीर केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “कोकण विभागीय आयुक्तांकडून तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.”