‘तो’ कोरोनाबाधीत अधिकारी आरोग्य समितीच्या बैठकीत उपस्थित

जळगाव प्रतिनिधी । काल आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्‍याचा समावेश असल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली असतांना आता हाच अधिकारी आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित असल्याने त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना क्वॉरंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे.

याबाबत असे की, काल आलेल्या रिपोर्टमध्ये जळगाव जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. याबाबत प्रशासनातर्फे अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, हाच अधिकारी काल आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार व आमदारांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीला जिल्हाधिकार्‍यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे हा अधिकारी कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content