Home Cities अमळनेर ‘ते’ पाच पॉझिटीव्ह रूग्ण मुंगसेचे नव्हे तर अमळनेरचे

‘ते’ पाच पॉझिटीव्ह रूग्ण मुंगसेचे नव्हे तर अमळनेरचे

0
19

जळगाव प्रतिनिधी । आज कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेले रूग्ण हे मुंगसे (ता. अमळनेर) येथील नसून अमळनेर येथील असल्याची माहिती प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

आज जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल आले. यात मुंगसे (ता. अमळनेर) येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर थोड्या वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. खरं तर हे पाच जण अमळनेर येथील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील असल्याचे प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. आम्ही या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत असून संबंधीत बातमी तातडीने दुरूस्त करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound