हैदराबाद (वृत्तसंस्था) तेलंगणातील वानापार्थी येथील खासगी शाळेतील एका शिक्षकाने ११ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दोन मुलींनी आपल्या वडिलांकडे गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगितले. यावर पालकांनी विचारल्यास मुलींकडून शिक्षकांनी आमच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यावर हे प्रकरण समोर आले. नराधम शिक्षक विद्यार्थींवर शाळेच्या परिसरातच अत्याचार करायचा. आरोपी शिक्षकाचे वय २६ आहे. १० वर्षाच्या एका मुलीच्या पालकांडून तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण समोर आले. आरोपीविरुद्ध भादवि कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.