मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहातील रूम ही विनापास देण्याच्या कारणावरून सरकारी कर्मचाऱ्याशी दोघांनी हुज्जत घालून धक्काबुक्की करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २० मे रोजी दोन जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरात शासकीय विश्रामगृह आहे. १९ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील योगेश काळे आणि संजय काळे हे दोघे शासकीय विश्रामगृह येथे आले. सहाय्यक स्थापत्य अधिकारी सचितानंद अशोक शेजवळ हे तिथे नोकरीला होते. त्यावेळी शासकीय काम करत असतांना यागेश काळे आणि संजय कोळी हे तिथो आले. शासकीय विश्रामगृहातील रूम विनापास देण्याची मागणी केली. त्यावर सचितानंद यांनी नकार दिला. या रागातून दोघांनी शासकीय कर्मचारी शेजवळ यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करत मारहाण केली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. “तू कशी नोकरी करतो, तुला पाहून घेवू” अशी धमकी दिली. याप्रकरणी त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संजय कोळी आणि योगेश कोळी या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.