नागपूर वृत्तसंस्था । लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता मिळताच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. अनुज बघेल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागपुरात गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता मिळताच गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नागपुरात बुधवारी रात्री तुरुंगातून सुटलेल्या अनुज बघेल या व्यक्तीची हत्या झाली. तो 16 मे रोजी तुरुंगातून सुटला होता. अनुज बघेलने तुरुंगात जाण्यापूर्वी एका व्यक्तीची गाडी जाळली होती. या मुद्यावरुन दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यातून अनुज बघेलची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केले आहे. नागपुरात गेल्या काही दिवसात चार ते पाच हत्तेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.