बापरे.. जिल्ह्यात आज ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांचा आकडा ९०७ वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जळगाव शहर ७, भुसावळ ७, अमळनेर ४, भडगाव १, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर ५ आणि पारोळा ५ असे एकुण ३७ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांचा आकडा ९०७ वर पोहचला आहे. शासनाच्या नियमांचे नागरीकांनी पालन करणे गरजेचे आहे. जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी नागरिकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर फिरणे आतातरी टाळा, घरातच सुरक्षित रहा असे जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. आज एकुण ३६ रूग्ण आढळून आल्याचे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content