जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकाराम वाडी येथील बाल आणि सेल्स एजन्सीज या हार्डवेअर दुकानाला रात्री दीड वाजता शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत सुमारे 65 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आजची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीनुसार, सिंधी कॉलनी येथील रहिवासी जगदीश रामचंद्र बालाणी यांच्या मालकीचे तुकाराम वाडी येथे ये बालाणी एजन्सिज नावाने हार्डवेअर, प्लंबिंग साहित्य विक्रीचे दुकान व गोदाम आहे. शनिवारी मध्यरात्री नंतर १४ जून रोजी दीड वाजेच्या सुमारास बालाणी यांना दुकाना शेजारील रहिवासी पंकज दौलत खानकार यांनी तुमच्या दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. तत्काळ जगदीश बालाणी यांनी अग्निशामक दलास माहिती देऊन लहान भाऊ अमर बळणी विनोद बालनी आणि बिरजू बालानी, रवी बलानी अशांसह दुकानावर पोहोचल्यानंतर संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. एमआयडीसी पोलीस शेजारील रहिवासी आणि अग्निशामक दलाच्या मदतीने पहाटे पाच पर्यंत बुजविण्याचे काम सुरू होते. अग्निशामक दलाच्या सहा वाहनांनी सकाळी सहा वाजता आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात यात यश आले.
६५ लाखांचे नुकसान
आगीत हार्डवेअर साहित्य प्लायवूड, प्लंबिंगचे साहित्य आणि दुकानातील इतर सर्व माल आगीत पूर्णतः खाक झाले असून या दुर्घटनेत जवळपास ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जगदीश बालाणी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
आग लागल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, पोहेकॉ दीपक चौधरी असे रात्री घटनास्थळी जाऊन अग्नीशमन बंब बोलविण्यात आले होते. सदर बाबतीत आकस्मित आग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाघमारे सचिन मुंडे करीत आहे.