जळगाव, प्रतिनिधी । नरडाणा येथील मधुकर राव सीसोदे महाविद्यालयांच्या प्राचार्य पदासाठी संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमध्ये होरपळत असतांना मे महिन्यांत प्र कुलगुरू, शिक्षण उपसंचालक यांच्या मान्यतेने जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यास विरोध झाल्यानंतर ही प्रक्रिया लॉक डाऊन संपल्यानंतर राबविण्यात यावी असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.
नरडाणा महाविद्यालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर शासन,विद्यापीठ , शिक्षण उपसंचालक यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मान्य केल्यानंतर ही भरती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये न घेता मे महिन्यात ही प्रक्रिया राबविल्याने याबाबत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महानगर सचिव ऍड. कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भुषण संजय भदाणे, माजी सीनेट सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी युवती जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर , अमोल राजपूत , गौरव वाणी आदींनी शंका उपस्थित केली होती. या भरती प्रकाणाविरोधात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण संचालक आदींकडे तक्रार केली होती. यातक्रारीनंतर लॉक डाऊन काळात अर्जदारांना महाविद्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करणे अडचणीचे ठरत असल्याने ही भरती प्रक्रिया राज्य शासन जेव्हा लॉक डाऊन उठवेल तेव्हा राबविण्यात यावीत असे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत. दरम्यान, नरडाणा महाविद्यालयासह संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे , चोपडा एज्युकेशन सोसायटी, चोपडा, ता. चोपडा जि. जळगाव, जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळ, विठ्ठल मंदिर चौक, मेहरूणता. जि. जळगाव, महात्मा फुले बहूउद्देशिय संस्था, नेर ता.जि. धुळे यांची देखील भरती प्रक्रिया ही लॉक डाऊन नंतर होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.