जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेला ३ लाखांसाठी मारहाण व शिवीगाळ करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरुवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या प्रियंका योगेश माळी (वय-२४) यांचा विवाह २४ डिसेंबर २०२१ रोजी मुक्ताईनगर येथील योगेश नारायण माळी यांच्यासोबत रीतीरी वाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस झाल्यानंतर पती योगेश माळी हा किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने दुकान टाकण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तुला नांदवणार नाही अशी धमकी दिली. तसेच पैशांसाठी सासरकडी मंडळींनी तगादा लागवला. हा त्रास न सहन झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरुवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता विवाहितेने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती योगेश नारायण माळी, सासू संगीता नारायण माळी, ननंद अक्का अजय माळी, नंदोई भाऊ अजय हरी माळी, जेठ संजय नारायण माळी, जेठाणी पुष्पा संजय माळी, मावस सासू शोभा कैलास माळी, मावस दिर हेमंत कैलास माळी सर्व रा. मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.