तीन महिने कर्जाचा हप्ता भरू नका असे सांगता, मग त्यावर व्याज कसे लावता? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तीन महिने कर्जाचा हप्ता भरू नका असे सांगता, मग त्यावर व्याज कसे लावता? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बँक ऑफ इंडियाला केली आहे. कोरोनामुळे आरबीआयने कर्जाचे हफ्ते ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. परंतू त्यावरील व्याज मात्र वसूल करणार होते. याच संबंधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनवाई झाली.

 

२५ मार्च रोजी आरबीयने कर्जाचे हफ्ते न भरण्यासाठी तीन महिन्यांची मुभा देत असल्याचं जाहीर केले होते. यानंतर २२ जून रोजी अजून तीन महिन्यांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली होती. न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांनी सुनावणीवेळी विचारणा केली की, जर तुम्ही तीन महिन्यांसाठी कर्ज माफ केले आहे. तर मग तुम्ही त्यावर व्याज कसे काय लावू शकता? ही आमची मुख्य काळजी आहे. दरम्यान, व्याज माफ केल्यास बँकांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असे बँकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी १७ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Protected Content