जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची गौरव संपन्न असलेल्या 19 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी छत्रपती संभाजी नाट्यगृह या ठिकाणी उद्यापासून १० ते १३ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन मागील काळात बालनाट्य स्पर्धेतून यश संपादन केलेल्या कलावंतांच्या हस्ते होणार आहे, यंदा उदघाटनाचा मान कु. प्रतिक्षा झांबरे, कु. भूमिका घोरपडे, कु. निशा पाटील, कु. कृष्णा चव्हाण, कु. स्वराली जोशी यांना देण्यात आला आहे. यंदा बालनाट्य स्पर्धेत 22 बालनाट्य सादर होणार आहेत. बालनाट्य बघण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच रसिक प्रेक्षकांना विनंती की त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.