नवी दिल्ली (वृत्तसंस्था) येस बँकेच्या खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवर लावण्यात आलेले निर्बंध पुढील तीन दिवसात हटवण्यात येणार आहेत. यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत. ही पुनर्बांधणी योजना लागू होण्याच्या तारेखपासून पुढील तीन दिवसांमध्ये येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येतील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकींग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागत होता.