तीन दिवशीय मूल्यसंवर्धन जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन

press

जळगाव, प्रतिनिधी | शिक्षणासोबतच आजच्या परिस्थितीत मूल्यशिक्षणाची आवश्यकता असल्याने याचे महत्त्व लक्षात घेऊन शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मूल्यसंवर्धनाचे धडे दिले जात आहेत. नितीमुल्य शाळेतूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजविले जाते. समाजातील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी मूल्यशिक्षणाशिवाय पर्याय नसून हा उपक्रम त्यासाठी फायद्याचा आहे अशी माहिती शांतीलाल मुथा यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख विनय पारख, शांतीलाल मुथा फाउंडेशनचे तालुका प्रमुख तेजस कावडीया उपस्थित होते.

जळगाव शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे मूल्यसंवर्धन जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवशीय हा मेळावा असून मेळाव्यात पोस्टर्स प्रदर्शनाच्या माध्यमातून मूल्यशिक्षणाचे धडे देण्यात येत आहे.  बुधवारी सकाळी महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, प्राचार्या मंजुषा क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी डी. एन. देवांग, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, दलूभाऊ जैन आदींच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्यभरात शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि राज्य शासनाच्यावतीने मूल्यसंवर्धन मेळावा घेण्यात येत आहे. ५ फेब्रुवारीपासून जळगाव शहरात हा मिळावा होत आहे. मेळाव्याला जिल्ह्याभरातील जिल्हा परिषदेचे शिक्षक उपस्थित होते. मूल्यसंवर्धनासाठी शिक्षक राबवीत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. जिल्ह्यात ५१६५ शिक्षकांना मूल्यशिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून १ लाख ५५८०० विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देण्यात आल्याची माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली. या उपक्रमातून शिक्षकांची सृजनशक्ती देखील समोर येत आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याचे मुथा यांनी सांगितले.

Protected Content