Home धर्म-समाज तालुकाध्यक्षपदी आकाश इंगळे यांची निवड

तालुकाध्यक्षपदी आकाश इंगळे यांची निवड

0
74

भुसावळ, प्रतिनिधी । नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी आकाश सुधाकर इंगळे यांची निवड करण्‍यात आली आहे. श्री. इंगळेंसबत इतर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहेः.

नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुक्याची उर्वरित कार्यकारीणीत तालुका उपाध्यक्ष गिरीश देविदास पाटील, तालुका सचिव नोविता सुरेश कोल्हे, तालुका समन्वयक जान्हवी जितेंद्र नेहेते, रोहित हेमराज पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिककाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार असून लवकरच तालुका उर्वरित कार्यकारणी तयार करून घोषित करणार असल्‍याचे तालुकाध्यक्ष आकाश इंगळे यांनी सांगितले.


Protected Content

Play sound