तायक्वोंदो स्पर्धेत प्रताप महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सुवर्ण पदकांचे मानकरी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत झालेल्या अंतर विभागीय ज्युडो, तायक्वोंदो स्पर्धेत प्रताप महाविद्यालयातील जयेश जगताप, पलक कोचर यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. प्रस्तुत स्पर्धा ही दि. 23 नोव्हेंबर रोजी कला आणि विज्ञान महाविद्यालय दहिवेल येथे संपन्न झाली.

 

सदर झालेल्या ज्युडो स्पर्धेत प्रतापच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविले. या पुढे ते राष्ट्रीय स्तरावर खेळतील, ही अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा येणा-या महिण्यात पंजाब येथे होणार आहे. जयेश आणि पलक यांची झालेली निवड ही कौतुकास्पद स्वरुपाची एक बाब आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल खा.शि. मंडळाच अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्याध्यक्ष हरिभाऊ वाणी, कार्य उपाध्यक्ष योगेश भैय्या मुंदडे,डॉ.अनिल शिंदे,डॉ.संदेश गुजराथी,सी.ए.निरज अग्रवाल,प्रदिप अग्रवाल,विनोद पाटील,कल्याण पाटील,सेक्रेटरी डॉ. ए.बी.जैन, मा.प्राचार्य प्रकाश शिरोडे,उप प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,डॉ.जयंत पटवर्धन,डॉ.जयेश गुजराथी,डॉ.कल्पना पाटील,डॉ.निकुंभ,राकेश भाऊ निळे,वरिष्ठ जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.विजय तुंटे, क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील सर, प्रा.अमृत अग्रवाल, जिमखाना समितीतील सर्व सदस्य,जगदीश शिंगाने, मेहुल ठाकरे,सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Protected Content