चोपडा, प्रतिनिधी । तांडव वेब सिरीजचे दिग्दर्शक व अभिनेता यांच्या विरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नरेंद्र मोदी टीमने पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तांडव वेब सिरीजचे दिग्दर्शक अली आब्बास जफर, अभिनेता सैफ आली खान यांच्या विरोधात कलम १२४ए आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हिंदू देव देवदेवतांचा अपमान होईल असले कृत्य कोणत्याही घटकाकडून होणार नाही याची तत्काळ दखल घेण्यात यावी. यापुढे हिंदू धर्माचा चित्रपट, नाटक, जाहिरात किंवा अन्य माध्यमाद्वारे होणारा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नरेंद्र मोदी टीम हिंमतराव पाटील यांची स्वाक्षरी आहे.